किती काळ लोटला मधे हे मला मोजावे लागले.
कोंडलेल्या भावनांना व्यक्त ना केले कधी,
हृदयी जे घुसमटले ते मला सोसावे लागले.
सापडला नाही मजला चेहरा हा तुझा कधी,
रोज नवे मुखवटे तुझे हे मला ओळखावे लागले.
निसटलेल्या नात्यांची वाटली ना खंत कधी,
पण बांधणारे बंध कोणते ? हे मला आठवावे लागले.
या सुखानो वाट चुकवूनी माझ्याही दारी कधी,
दु:ख लिम्पुनी घर माझे हे मला सारवावे लागले.
भूतकाळाची करुन पाहु उजळणी ती पुन्हा कधी,
किती राहिले 'हातचे' बाकी हे मला मांडावे लागले.
वाट पहाते तुझी जीवना, भेटुन जा एकदा कधी,
तुझे केवढे हे ऋण मजवरी, मला फेडावे लागले.
आज वळून पाहताना जीवना, तुला शोधावे लागले
किती काळ लोटला मधे हे मला मोजावे लागले.
KUNALA SHODHTE AAHES,YEWDHI OODAAS KA AAHES. TOOZI KAVITA KAAHI WEGALECH SANGATAT.
ReplyDeletemitale dole mi jevha kalale jivan, kal, maza mee hi tuch ahes,
ReplyDeletebhanavar yenya sathi mala - swatahlach shodhave lagale