नाव रिकामी लाटांवरती डोलत
होती
गोष्ट कुणा सफरीची
त्यांना सांगत होती.
विशण्णवारे
वेशी बाहेरच थोपावुदेत
मनोदेवता रोज प्रार्थना
करत होती.
बसुन होती एक
उदासी खोलीत मनाच्या
कातरवेळी तिची आर्तता
भासत होती.
पुन्हा भेटुया क्षितिजावरती
आपण दोघे
ढळता ढळता सुर्यास
सांज सांगत होती.
मनसुबे जरी खुशालीचे
रचत होते
नियतीसुद्धा
एक योजना आखत
होती.
विसरुनी जाऊया जुन्या
वाटेचे लागेबांधे
असे म्हणुनी ,नवी पहाट नव्या दिशेला चालत
होती.
होती.
No comments:
Post a Comment