अंधारात प्रकाशाची वाट चुकले मी .....

अंधारात प्रकाशाची वाट चुकले मी

शोधीत राहिले स्वतःला तरी मलाच न सापडले मी.

 
झेपावले ज्याच्या साठी ते मृगजळ हाती आले

होता जवळी सागर तरी तृष्ट्त राहिले मी.

 
पाहता मृत भावनांना हृदय विदीर्ण झाले

जरी उरले ना बंध काही तरी त्या भावनांचे ओझे वाहिले मी.

धगधगत्या ज्वाळांनी हे जग वेढलेले अन अस्तित्वाची माझ्या चिता पेटलेली
तरी का अंगारात मलाच लोटले मी.


विझेल का हा अग्नी कधी पेटत आहे चिता अजुनी

का धुमसत राहिले आजही निखारे विषन्णवारे जरी थोपवले मी.


1 comment:

  1. amazing...its very touchy...i am still puzzled whether is this the same manisha i met her in 1983?????

    ReplyDelete