लाट , किनारा आणि धरती

लाट आणि किनारा परस्पर विरोधी तरी एकमेकात गुंतलेले नात. लाटेने सतत अवखळपणे किनाऱ्याकडे धावावं आणि जणु तक्रार करत किनाऱ्याला विचारावं " तु सदा कोरडा अन मलाच का नेहमी अस उधाण यावं????? " किनारा मात्र जाणीवपुर्वक तिचा हा अवखळपणा दुर्लक्षित करत तटस्थपणे उभा, जणु धरतीशी घट्ट वचनबद्ध असल्यासारखा..........



म्हणून तर किनाऱ्याने दिवसभर तटरक्षण करून सांभाळलेल्या धरतीला, काळोखाने कुशीत घेतल्यावर ओहटीची जड ओली वाळु किनाऱ्याला सोबत देत असेल का? असा विचार मनात डोकावुन जातो. 

मावळला तो सुर्य क्षितिजावर धुसर झाला किनारा
ओहटीची जड ओली वाळु तिचाच आता सहारा.
उदास किरणे झिरपत गेली खोल काळजात
पश्चिमेस ती लाली पसरली धरतीच्या विरहात.
निशब्द हि सांजवेळ घेऊन येई एकटेपण
आभाळासही देऊन जाई एक विरक्त परकेपण.
अबोल शांत वारा अन स्तब्ध झाला किनारा
अंधारात विलीन धरती अन राहिला एकटा तो बिचारा.
 







1 comment: