रुतलेली वेदना


निशब्द किनाऱ्यावर मी गुणगुणत फिरत आहे 
घेऊन हजारो लाटा दर्या  खळखळत आहे
कुठे नेईल बैचेनी मनाचीकधी संपेल शोध मनाचा 
कोराच विचार उद्याचा मनात वळवळत आहे.  
जुन्या आठवणींना मी आत्ताच सारले मागे 
तरी आभासांचा पडदा सतत सळसळत आहे. 
हे कसे उचंबळणे हा तर केवळ लाटांचा  तांडा 
रुतुन वेदना मनाची ,ओल्या वाळुत भळभळत आहे

No comments:

Post a Comment